मिशन मंगलच्या दिग्दर्शकाला मेंदूत गाठ, आली भोवळ, अक्षय कुमार आला धावून

अक्षय कुमार आणि विद्या बालन फेम चित्रपट 'मिशन मंगल'चे डायरेक्टर जगन शक्ती यांना कोकीला बेन हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

'Mission Mangal'fame director Jagan Shakti arrives at Kokila Ben Hospital
'मिशन मंगल' फेम डायरेक्टर जगन शक्ती हे कोकीला बेन हॉस्पीटलमध्ये दाखल  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई:  अक्षय कुमार आणि विद्या बालन फेम चित्रपट 'मिशन मंगल'चे डायरेक्टर जगन शक्ती यांना कोकीला बेन हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. एका पार्टीमध्ये त्यांना अचानक भोवळ आल्याने त्यांना हॉस्पीटलमध्ये तातडीने दाखल केल्यावर समजलं की, त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ आहे. त्यासाठी त्यांची सर्जरी करण्यात आली.

 जगन यांना भोवळ आल्यावर तातडीने अक्षय कुमारने त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल केले, आणि जगन शक्ती यांची सर्व जबाबदारी अक्षय कुमारने घेतली. अक्षय कुमार आणि जगन शक्ती यांची मैत्री खूप घनिष्ठ आहे, ते यावरून दिसते. मिशन मंगल चित्रपटाचे प्रोड्युसर आर बाल्की यांनी सांगितले की, जगन शक्ती यांची सर्जरी यशस्वीपणे पार पडली आली असून ते आता पूर्णपणे बरे आहेत.

जगन शक्ती यांनी मिशन मंगल या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पहिले पाऊल ठेवले. हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला. आता ते त्यांचा तमीळ चित्रपट 'कतीथी'चा हिंदी रिमेक 'एक्का'वर काम चालू केले आहे. चित्रपट 'एक्का' बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की ते चित्रपटाची कथेवर भर देत आहेत, आणि लवकरच त्यांच्या ह्या चित्रपटाची घोषणा होईल. या चित्रपटासाठी अक्षय कुमारचे नाव पुढे आले होते, परंतु अजून चित्रपटाचे कास्टींग झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जगन कुमार यांच्याबद्दल बोलताना अक्षय कुमारने सांगितले की मिशन मंगल या इस्रोच्या यशस्वी चाचणीवर आधारित  चित्रपटाची कथा लिहिणे तेवढे सोपे नाही, परंतु जगनने हे बिनचूक केले, असे सांगताना अक्षयने त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना देखील केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी