मुंबई: Amazon ओरिजिनल सीरिजमध्ये फ्रंटलाइनवर लढणाऱ्या नायकांना श्रद्धांजली वाहिली आहे. निखिल अडवाणी आणि ऐमी एंटरटेन्मेंट निर्मित 'मुंबई डायरीज २६/११' सीरीजमध्ये शहरातील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अभूतपूर्व संकटाचा सामना करणाऱ्या आणि फ्रंटलाइनवर लढणाऱ्या नायकांच्या शौर्यास श्रद्धांजली यामार्फत देण्यात आली आहे.
कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई आणि श्रेया धन्वंतरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत डॉक्टर, परिचारिका, पॅरा मेडिकल आणि रुग्णालयातील कर्मचार्यांची आजपर्यंत कधीही समोर न आलेली किंवा न ऐकलेली कहाणी सादर करण्यात येणार आहे. ही सीरीज Amazon प्राइम व्हिडिओवर मार्च 2021 मध्ये रिलीज केली जाईल. अमेझॉन प्राइम व्हिडिओने मुंबईवरील भयानक दहशतवादी हल्ल्याच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त दहशतवाद्यांशी लढा देणाऱ्या नायकांच्या शौर्यास अभिवादन केले आहे. तसेच त्यांची आगामी वेब सीरीज मुंबई डायरीज 26/11चा पहिला लूक जारी केला आहे. मुंबई डायरी 26/11 ही वेबसीरीज २०० देशात आणि Amazon प्राइमवर लाँच केली जाईल.