Nach Baliye 9 : प्रभासकडून दबंग खानची नक्कल, 'जुम्मे की रात' या गाण्यावर डान्स

बी टाऊन
Updated Aug 23, 2019 | 20:05 IST | Zoom

प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी 'साहो' हा चित्रपट ३० ऑगस्टला रिलीज होत आहे. अलीकडे या जोडीनं 'नच बलिये ९' मध्ये हजेरी लावली. यावेळी प्रभासनं शोची जज रविना टंडनबरोबर 'जुम्मे की रात' या गाण्यावर डान्स केला.

nach baliye 9
साहो  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : साऊथचा सुपरस्टार प्रभास 'साहो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलीकडेच  प्रभास त्याचा आगामी चित्रपट ‘साहो’ च्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूर सोबत 'नच बलिये ९' च्या सेटवर पोहोचला होता. यादरम्यान प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि शोचे जज अहमद खान यांच्या आदेशानुसार प्रभासनं रवीना टंडनबरोबर सलमान खानच्या  'जुम्मे की रात' या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. 

यानंतर चाहत्यांनी प्रभासचे जोरदार कौतुक केलं. हा चित्रपट येत्या ३० ऑगस्टला रिलीज होईल. हिंदीसह तमिळ आणि तेलगू भाषेमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.  या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात नील नितिन मुकेश, श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी आणि महेश मांजरेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...