आमिर खानमुळे समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट? 'या' अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ

Naga Chaitanya - Samantha: नागा चैतन्य आणि समंथा यांचा घटस्फोट आमिर खान याच्यामुळे झाल्याचा दावा एका अभिनेत्याने केला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आमिर खानमुळे समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट? या अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ
Naga Chaitanya samantha Ruth Prabhu divorce krk alleges aamir khan convinced for it watch video 

Naga Chaitanya samantha Ruth Prabhu divorce: नेहमीच वादात असलेला अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके हा आपल्या विधानांमुळे वादात सापडतो. आता याच केआरके याने नागा चैतन्या आणि समंथा यांच्या घटस्फोटाच्या संदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. (Naga Chaitanya samantha Ruth Prabhu divorce krk alleges aamir khan convinced for it watch video)

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "आमिर खान याने नागा चैतन्य याला आपली पत्नी समंथा हिच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी कसं तयार केलं याची संपूर्ण कहाणी माझ्याकडे आहे. म्हणजेच त्याचं हार्ट हे काळं आहे. तर मित्रांनो, अशा व्यक्तीचा चित्रपट चालू शकत नाही. माझा रिव्ह्यू लवकरच रिलीज होईल."

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहिले, "मी गेल्या एक महिन्यापासून आमिर खानचा ड्रामा पाहत आहे. मी सांगतो की, तो एक शातिर माणूस आहे. अशा परिस्थथितीत, त्याच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटावर बहिष्कार टाकायला हवा आणि त्याल एक वेब सीरिज अभिनेता बनवलं पाहिजे. मला अपेक्षा आहे की, तुम्ही सर्व तसंच कराल."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी