सध्याच्या सरकार स्थापनेवर 'गणेश म्हैसतोंडेची झाली ही अवस्था

बी टाऊन
Updated Nov 22, 2019 | 19:47 IST

गेल्या २८ दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्ता समिकरणामुळे सामन्य नागरीक खूप वैतागले आहेत. तसेच हा सत्ता संघर्ष कव्हर करणाऱ्या मीडियाच्या रिपोर्टचीसुद्धा हालत खराब झाली आहे.

मुंबई : गेल्या २८ दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्ता समिकरणामुळे सामन्य नागरीक खूप वैतागले आहेत. तसेच हा सत्ता संघर्ष कव्हर करणाऱ्या मीडियाच्या रिपोर्टचीसुद्धा हालत खराब झाली आहे. अशाच एका रिपोर्टर 'गणेश म्हैसतोंडे यांची काय हालत झाली आहे. हे सांगण्याचा एक उपहासात्मक प्रयत्न सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेल्या गणेश गायतोंडेचा मावस भाऊ गणेश म्हैसतोंडे हा रिपोर्टर झाला आणि त्यांची व्यवस्था काय झाली. याचा हा व्हिडिओ मराठीत खूप व्हायरल होत आहे. यात वरिष्ठ पत्रकार अमोल जोशी यांनी हे एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केले असून त्याचे नाव सुरवंट आहे.

या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय आणि सामाजिक विषयावर भाष्य केले जाते. परंतु, ते एका पत्रकाराच्या नजरेतून केले जाते. त्या पत्रकाराच्या बातमी करतानाच्या भावना काय असतात, हे यात दाखविण्यात येत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी