'मैने पायल है छनकाई'चे रिमिक्स गाणं नेहाला पडलं महागात

Neha Kakkar Trolled Social Media: नेहा कक्करने नुकतेच ओ सजना हे गाणे रिलीज केले आहे. 90 च्या दशकातील लोकप्रिय गाणे 'मैने पायल है छनकाई'चा हा हिंदी रिमेक आहे. फाल्गुनी पाठकच्या या गाण्याचे रिमिक्स केल्यामुळे नेहा कक्कर ट्रोल झाली आहे.

neha kakkar had to become a remix song of maine payal hai chhankai
'मैने पायल है छनकाई'चे रिमिक्स गाणं नेहाला पडलं महागात 

Neha Kakkar Trolled Social Media: नेहा कक्करने नुकतेच तिचे ओ सजना हे गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात नेहासोबत प्रियांक शर्मा आणि धनश्री वर्मा आहेत. नेहा कक्करचे नवीन गाणे फाल्गुनी पाठकच्या मूळ गाणे 'मैने पायल है छनकाई'चा रिमेक आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर यूजर्सनी नेहा कक्करला सोशल मीडियावर ट्रोल केले. (neha kakkar had to become a remix song of maine payal hai chhankai)

एका यूजरने लिहिले की, 'मी नेहा कक्कर आणि तनिष्क बागचीच्या 'ओ सजना' या रिमिक्सवर बहिष्कार टाकतो. तू मैने पायल है छनकाईची कॉपीही करू शकत नाही. 

दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'मी नुकतेच 90 चे लोकप्रिय गाणे ऐकत होतो आणि त्यानंतर मी नेहा कक्करच्या पायल है छनकाई या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन ऐकले. आत्महत्या करावीशी वाटली. 90 चे पॉप संगीत सर्वोत्कृष्ट आहे यात शंका नाही. 

सोशल मीडियावर लोक सतत नेहा कक्करला ट्रोल करत आहेत. सध्या ही अभिनेत्री इंडियन आयडॉल 13 ची जज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी