Rhea Chakraborty ने एनसीबीला नाही सांगितले सर्व सत्य, तपासात झाला खुलासा

बी टाऊन
Updated Sep 14, 2020 | 16:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

NCB grills Rhea Chakraborty: नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)च्या चौकशीत रिया चक्रवर्तीबाबत नवी गोष्ट समोर आली आहे. 

rhea chakraborty
Rhea Chakraborty ने एनसीबीला नाही सांगितले सर्व सत्य 

थोडं पण कामाचं

  • सुशांत प्रकरणात ड्रग अँगलने चालू आहे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तपास
  • एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की रियाजवळून आणखी एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 
  • ड्रग पेडलरशी बातचीत करताना रिया आपल्या आईचा मोबाईल वापरत होती

मुंबई: सुशांत सिंह राजपूत प्रकरणात(sushant singh rajput case) ड्रग तस्करी(drugs) अँगलने तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)(narcotics control bureau)कडे आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे. तपास एजन्सीशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार अशी माहिती समोर आली आहे की रिया चक्रवर्ती(rhea chkraborty) ड्रग तस्करांशी बातचीत करताना आपल्या आईच्या नावावर रजिस्टर्ड मोबाईल फोनचा वापर करत होती. तपासादरम्यान एनसीबीच्या छाप्यादरम्यान हा फोन ताब्यात घेण्यात आला. या फोनचे कॉल डिटेल्स समोर आले आहेत. या मोबाईल फोच्या बातचीतचा डेटा तपास एजन्सीच्या हाती लागला आहे यात रिया आणि ड्रग तस्कर यांच्यातील बातचीत समोर आली आहे. या प्रकरणी नव्या खुलासानंतर रियाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

आपल्या आईचा मोबाईल फोन वापरत होती रिया

सुशांत प्रकरणात मनी लाँडरिंच्या अँगलने तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचलनालयाने(ईडी)ने रियाच्या मोबाल फोनचा व्हॉट्सअॅप डेटा रिट्रीव्ह केला होता. या संभाषणात रिया आणि ड्रग तस्कर यांच्यातील संभाषणाचा खुलासा झाला त्यानंतर ईडीने हे प्रकरण एनसीबीकडे दिले. एनसीबीने जेव्हा रियाच्या घरी छापा टाकला तेव्हा तपासादरम्यान रियाचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप घेतला. 

मोबाईल फोनचा डेटा तपास एजन्सीने रिट्रीव्ह केला

रियाच्या मोबाईल फोनमधून व्हॉट्सअॅप चॅटची जी माहिती समोर आली सुशांतसिंह राजपूतला ड्रग देण्याबाबतही संभाषण झाले होते. रिया काही लोकांकडून ड्रगची मागणीकरत होते. यानंतर काही दिवसांनी एनसीबीने रियाचा मोबाईल फोन जप्त केला. हा मोबाईल फोन रियाच्या आईच्या नावावर रजिस्टर्ड आहे. रियाने हा फोन तपास एजन्सीला दिला नव्हता. आता या मोबाईल फोनचा व्हॉट्सअॅप डेा एनसीबीने रिट्रीव्ह केला आहे. या चॅटमध्ये रिया आणि ड्रग तस्कर यांच्यात संभाषण झाले होते.

बॉलिवूडचे कलाकार रडारवर

एनसीबीच्या चौकशीदरम्यान रियाने ड्रग मंडळींशी संपर्क असल्याचे कबूल केले. तिने बॉलिवूडच्या १५ जणांची नावे घेतली. आता हे सर्व एनसीबीच्या रडारवर आहेत. तपास एजन्सी या कलाकारांना बोलवून चौकशी करू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी