[VIDEO] अभिनेत्री मौनी रॉयच्या मादक अदा, चाहतेही घायाळ 

बी टाऊन
Updated Oct 10, 2019 | 17:36 IST

Mouni Roy's Dance: अभिनेत्री मौनी रॉय हिचं एक नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. यामध्ये तिचा लूक खूपच भन्नाट दिसतो आहे. 

मुंबई: राजकुमार राव आणि मौनी रॉय यांचा सिनेमा मेड इन चायनाचं नवं गाणं 'द नारी नारी' (The Naari Naari Song) नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्यात राजकुमार राव आणि मौनी हे अगदीच हिप हॉप स्टाइलमध्ये दिसत आहेत. दोघंही आपल्या लूकमध्ये खूपच वेगळे दिसत आहेत. हे गाणं एक आयटम नंबर आहे. ज्यामध्ये मौनीने खूपचा जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या मादक अदांनी तिने आपल्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ केलं आहे. दुसरीकडे राजकुमार राव याने देखील आपल्या डान्स स्टाइलने तिला चांगली टक्कर दिली आहे. या गाण्यात विशाल ददलानी, जोनिता गांधी आणि सचिन-जिगर यांचा आवाज आहे. 

मेड इन चायनामध्ये राजकुमार एक संघर्ष करणारा बिझनेसमन दाखवण्यात आला असून मौनी रॉय ही त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. मेड इन चायना सिनेमात राजकुमार आणि मौनी यांच्याशिवाय परेश रावल, बोमन इराणी, गजराज राव आणि सुमित व्यास हे देखील प्रमुख भूमिकेत दिसून येतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...