सुशांतने मृत्यूच्या ५ दिवसआधी घरच्यांना पाठवला होता SOS मेसेज, धक्कादायक माहिती आली समोर

बी टाऊन
Updated Sep 22, 2020 | 13:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

SSR case: सुशांत सिंह प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यूच्या ५ दिवसआधी सुशांतने घरच्यांना मेसेज केला होता. 

sushant singh rajput
सुशांतने मृत्यूच्या ५ दिवसआधी घरच्यांना पाठवला होता हा मेसेज 

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह प्रकरणाला धक्कादायक वळण
  • मृत्यूच्या ५ दिवस आधी केला होता SOS
  • मला भीती वाटत आहे. ते मला मारून टाकतील असा केला होता मेसेज

मुंबई: सुशांत सिंह राजपूत प्रकरणात(sushant singh suicide case) रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. नुकतीच जी माहिती समोर आली आहे ती खूपच आश्चर्यचकित करणारी आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टननुसार सुशांतने मृत्यूच्या ५ दिवसआधी(5 days before death) आपल्या घरच्यांना SOS मेसेज केला होता. यात त्याने म्हटले होते की मला भीती वाटत आहे. मला मारून टाकतील. 

सुशांतने आपली बहीण मीतूला(message to meetu) हा मेसेज केला होता. सुशांतने हा मेसेज ९ जूनला केला होता. दिशाचे(disha death) निधन झाल्यानंतर त्याच्या पुढच्याच दिवशी. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार सुशांतच्या SOS मेसेजमध्ये असे म्हटले होते की सुशांत रियाला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करत होता मात्र रियाने त्याला ब्लॉक केले होते. त्यामुळे तो तिच्याशी बोलू शकला नाही.  सुशांत प्ररणात ड्रग्स अँगलने एनसीबीच्या चौकशीदरम्यान रियाने सारा अली खानचेही नाव घेतले होते. आता अशीही बातमी येत आहे की एनसीबी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह, फॅशन डिझायनर सिमन खंबाता यांना या आठवड्यात चौकशीसाठी समन्स पाठवू शकते. 

एनसीबीने या चौकशीदरम्यान आतापर्यंत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह डझनभर लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच एनसीबीकडून सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी यांनाही चौकशीसाठी आज हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहेत. 

१४ जूनला सुशांतने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या अचानक जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला होता. त्याचे चाहतेही खूप दु:खात होते. सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे. दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. तसेच या प्रकरणाची ड्रग्स अँगलनेही चौकशी केली जात आहे. नारकोटिक्स कंट्रोल ऑफ ब्युरोकडूनही सुशांतची गर्लफ्रेंड रियाची कसून चौकशी होत आहे. तिच्यासोबत रियाचा भाऊ तसेच घरच्यांचीही चौकशी केली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी