[VIDEO]: प्रियंका चोपडा आणि निक जोनासने विकलं घर, घराची किंमत तब्बल...

बी टाऊन
Updated Aug 09, 2019 | 16:20 IST | Zoom

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा आणि पती निक जोनास यांनी नुकतच लॉस एंजेलिसमधील आपले घर विकले आहे. लग्नानंतर प्रियंका आणि निक या आलिशान घरात शिफ्ट झाल होते.

jonas priyanka chopra sold her house
प्रियंका चोपडा आणि निक  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोपडाने डिसेंबर २०१८ मध्ये निक जोनास बरोबर लग्न केलं. प्रियंका चोपडाने तिचा ३७ वा वाढदिवस नुकताच मियामीमध्ये साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे प्रियंका चर्चेत आली होती. अलीकडेच प्रियांका आणि निकने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रियंका आणि निक यांनी लॉस एंजेलिसमध्ये आपले आलिशान घर ४९ कोटी रुपयांना विकले आहे. हे घर प्रियंका आणि निकसाठी खूप खास होते. लग्नानंतर प्रियंका आणि निक या घरात शिफ्ट झाले होते. प्रियंकाला परिवारासोबत राहण्यासाठी मोठ घर हवं आहे, यासाठी ती आता नव्या घराच्या शोधात आहे. 

प्रियंका लवकरच बॉलिवूडमध्ये ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे. प्रियंका २०१६ साली आलेल्या जय गंगाजल चित्रपटात दिसली होती त्यानंतर प्रियंकाने बॉलिवूड चित्रपट केला नव्हता. ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटात प्रियंका चोपडा सोबतच जायरा वसीम, फरहान अख्तर आणि रोहित सराफ लीड रोलमध्ये दिसणार आहे. ‘द स्काय इज पिंक’ येत्या ११ ऑक्टोबर २०१९ ला रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...