नोरा फतेहीला केलं जातंय वाईटरित्या ट्रोल, उर्फी जावेदशी होतेय तुलना

Nora Fatehi TROLLED: आता नोरा फतेहीचा नुकताच एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नोरा डेनिम लूकमध्ये दिसत आहे.

nora fatehi getting trolled badly being compared to urfi javed on social media
नोरा फतेहीला केलं जातंय वाईटरित्या ट्रोल, उर्फी जावेदशी होतेय तुलना  |  फोटो सौजन्य: Instagram

Nora Fatehi gets compared with Urfi Javed: नोरा फतेही तिच्या हॉटनेस आणि जबरदस्त लुकसाठी ओळखली जाते. आता नुकताच नोरा फतेहीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नोराचा हा व्हिडिओ लोक खूप शेअर करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, नोरा फतेहीने डेनिम लूकमध्ये दिसत आहे. 

तिने फिकट रंगाचा डेनिम टॉप घातला आहे, डेनिम लॉवर आणि बूट घातले आहेत. हा व्हिडिओ एका शूटिंग सेटचा असल्याचे सांगण्यात येत आहे आणि तो समोर आल्यानंतर नोरा फतेहीला खूप ट्रोल केले जात आहे. या लूकसाठी काही लोक नोरा फतेहीला ट्रोल करत आहेत. इतकेच नाही तर यूजर्स तिची  उर्फी जावेदशी तुलना करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी