साडी नेसून क्रिकेट खेळली ही अभिनेत्री

Nora Fatehi Video: नोरा फतेही सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. नोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती गुलाबी रंगाची साडी परिधान करुन क्रिकेट खेळताना दिसत आहे.

nora fatehi learned to hold a bat from mithali raj played cricket in a pink sari
साडी नेसून क्रिकेट खेळली ही अभिनेत्री  |  फोटो सौजन्य: Instagram

Nora Fatehi Viral Video: भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजचा बायोपिक शाबाश मिथू  (Shabash Mithu) ऑगस्ट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मिताली राज (Mithali Raj) टीव्ही शो डान्स दिवाने ज्युनियरच्या सेटवर पोहोचली होती. यादरम्यान मिताली राज शोच्या जज नोरा फतेहीसोबत (Nora Fatehi) क्रिकेट खेळली.

नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नोरा फतेही पिंक कलरच्या साडीत दिसत आहे. यादरम्यान मिताली राज त्याला फलंदाजीच्या टिप्स देत आहे. 

मिताली नोरा फतेहीला बॅट व्यवस्थित पकडायला शिकवत आहे. याशिवाय मिताली नोराला सांगत आहे की, डोळे आणि लक्ष फक्त बॉलवर असावे. नोरानेही एक चांगला शॉटही मारला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते तिचं बरंच कौतुक करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी