[VIDEO] या अभिनेत्रीचा बोल्ड डान्स, सोशल मीडियावर धुमाकूळ

बी टाऊन
Updated Oct 09, 2019 | 16:56 IST

अभिनेत्री नोरा फतेही हिचं नवं गाणं एक तो कम जिंदगानी  हे १० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. तिच्या या गाण्याचा टिझरनेच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही पुन्हा एकदा ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. नोरा आपल्या फॅन्ससाठी लवकरच 'एक तो कम जिंदगानी' हे नवं गाणं घेऊन येणार आहे. या गाण्याचा टिझर काही नुकतंच रिलीज झालं आहे. ज्यामध्ये नोरा फतेही आपल्या बोल्ड लूकने फॅन्सना केलं घायाळ, व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये नोरा खूपच हॉट दिसते आहेत. या गाण्यात नोरा बेली डान्सच्या स्टेप्स करताना देखील दिसते आहे. 

नोरा फतेहीचं हे गाणं १० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. हे गाणं नेहा कक्कड आणि यश नारवेकर यांनी गायलं आहे. नोराने हे गाणं सिद्धार्थ मल्होत्रा, तारा सुतारिया आणि रितेश देशमुख यांचा आगामी सिनेमा मरजावांसाठी शूट केलं आहे. मिलाप झवेरी दिग्दर्शित मरजावां हा सिनेमा ८ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी