धक्कादायक दावा : आत्महत्या नाही, गळा दाबून केली गेली सुशांत सिंह राजपूतची हत्या

Vikas Singh’s claim in SSR case: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) करत आहे आणि सुशांतच्या शविवच्छेदन अहवालाचा तपास एम्समधील विषेशज्ञ डॉक्टरांचे एक पथक करत आहे.

Vikas Singh and Sushant Singh Rajput
आत्महत्या नाही, गळा दाबून केली गेली सुशांत सिंह राजपूतची हत्या, वकील विकास सिंह यांचा दावा  |  फोटो सौजन्य: Times of India

नवी दिल्ली: सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) वडिलांचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी शुक्रवारी एक खळबळजनक दावा (shocking claim) केला. विकास सिंह यांनी म्हटले की सुशांत सिंहने आत्महत्या (not suicide) केली नाही, तर गळा दाबून त्याचा खून (murdered by strangulation) करण्यात आला. सिंह यांनी असेही सांगितले की सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी (Sushant Singh death case) वैद्यकीय अहवालास विलंब (delay in medical report) होत असल्याने ते निराश आहेत. त्यांचा दावा आहे की एम्सच्या एका डॉक्टरांनी त्यांना सांगितले की ही २०० टक्के हत्या आहे. सिंह यांनी दावा केला की सुशांतच्या मृत्यूनंतर जी छायाचित्रे (Sushant’s photos after death) समोर आली होती त्यावरून हे स्पष्ट आहे की त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा तपास करत आहे सीबीआय

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) करत आहे आणि सुशांतच्या शविवच्छेदन अहवालाचा तपास एम्समधील विषेशज्ञ डॉक्टरांचे एक पथक करत आहे. एम्सचे हे पथक आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द करणार आहे. या अहवालास विलंब होत असल्याने विकास सिंह यांनी म्हटले आहे की ते निराश आहेत. सुशांत सिंह राजपूतचे शवविच्छेदन मुंबईच्या कूपर रुग्णालयात झाले होते.

कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदनावर उपस्थित झाले प्रश्न

कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुशांतचे शवविच्छेदन केले होते, पण या शवविच्छेदन अहवालात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. यापैकी सर्वात मोठी चूक म्हणजे मृत्यूच्या वेळेची नोंद नसणे. यामुळे कूपर रुग्णालयातील डॉक्टरांच्या भूमिकेवरही शंका उपस्थित करण्यात आली होती. एम्सच्या एका पथकाने या डॉक्टरांची चौकशीही केली आहे. सीबीआयने याप्रकरणी मुख्य संशयित रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी, नीरज यांच्यासह अनेक संशयितांची चौकशी केली आहे. तसेच सीबीआयने कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर एम्सच्या डॉक्टरांची मते मागितली आहेत.

सीबीआयला एम्सच्या अहवालाची प्रतीक्षा

एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे एक पथक मुंबईत आले आणि त्याने संबंधित डॉक्टरांची चौकशीही केली. या पथकाने सुशांतच्या बांद्रा येथील घरालाही भेट दिली आणि घटनेच्या वेळची परिस्थिती समजून घेतली. असे सांगण्यात येत आहे की एम्सच्या पथकाचा अहवाल मिळाल्यानंतर सीबीआय त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या तथ्यांसोबत त्यांची तुलना करेल. यानंतर त्यांना काही निष्कर्षाप्रत पोहोचण्यास मदत होईल. यादरम्यान या प्रकरणातील ड्रग्सच्या पैलूचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आपला तपास आणखी वेगवान केला आहे. एनसीबीने शुक्रवारी रकुल प्रीत सिंह आणि करिश्मा प्रकाश यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी