Pathan movie in theaters: पठाण सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीस, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
पुणे- आज दीपिका पदुकोण,जॉन अब्राहम आणि शाहरूख खानचा पठाण चित्रपट रिलीज झाला आहे. पुण्यातल्या व्हिक्टोरिया थिएटरला फुलांनी आणि फुग्यांनी सजवले होते. लोकांची सकाळपासून गर्दी झाली होती. चार वर्षांनंतर शाहरुख खानने त्याच्या पठाण चित्रपटासह अखेर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे आणि चित्रपटांचे बुकिंग आधीच हाऊसफुल्ल झाले.
'बेशरम रंग' हे गाणे गेल्या काही आठवड्यांपासून वादात होते पण या वादाच्या व्यतिरिक्त चाहत्यांनी शाहरुख खानच्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.