[VIDEO] सुपरस्टार प्रभासच्या अपकमिंग सिनेमाची शूटिंग झाली रद्द

बी टाऊन
Updated Nov 20, 2019 | 19:00 IST

साउथ सुपरस्टार प्रभासच्या प्रत्येक सिनेमाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना नेहमीच असते. तसंच त्याचा 'जान' हा अपकमिंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र काही कारणास्तव या सिनेमाची शूटिंग रद्द केली आहे.

मुंबई : साउथ सुपरस्टार प्रभासच्या 'बाहुबली' या सिनेमाने नवीन रेकॉर्ड केला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रभासने 'साहो' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात प्रभासच्या जोडीला अभिनेत्री श्रद्धा कपूर होती. मात्र साहो हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. आता प्रभासचा अपकमिंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अशी माहिती या व्हिडिओतून मिळाली आहे.
 
साहो या सिनेमानंतर प्रभासचा 'जान' हा अपकमिंग सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जान या सिनेमाची शूटिंग सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये प्रभासच्या काही शॉर्ट्सची शूटिंग युरोपमध्ये झाली. मात्र शूटिंगच्या नियमित वेळेत सिनेमाचा सेट तयार होत नसल्यामुळे, या सिनेमाची शूटिंग थांबिवण्यात आली. तसंच या सिनेमाच्या शूटिंगची डेटसुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रभास व्यतिरिक्त या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे.  
 
साहो या सिनेमाला अपयश मिळाल्यामुळे, सुपरस्टार प्रभासने सिनेमाच्या मेकर्सला बजेटकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. तसंच जान हा सिनेमा रोमँटिक थीमवर आधारीत आहे. परंतु या सिनेमाच्या शूटिंगला विलंब होत असल्यामुळे, प्रभासच्या चाहत्यांना या सिनेमाची वाट पाहावी लागणार आहे.

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी