[VIDEO] बॉलिवूडमध्ये पुन्हा दमदार कमबॅकसाठी प्रियंका चोपडा तयार 

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Sep 05, 2019 | 15:03 IST

प्रियंका चोपडाच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये आपली छाप सोडणारी प्रियंका लवकरच बॉलिवूडमध्ये आपलं ग्रॅड कमबॅक करण्याची शक्यता आहे. 

Priyanka Chopra
[VIDEO] प्रियंका चोपडा लवकरच साईन करणार हे तीन सिनेमे   |  फोटो सौजन्य: Instagram

एक्ट्रेस प्रियंका चोपडा जोनस गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून लांब आहे. प्रियंका लवकरच द स्काय इज पिंक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, प्रियंका बॉलिवूडमध्ये ग्रॅड कमबॅक करण्याचा विचार करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियंका आपल्या फॅन्ससोबत कनेक्शन ठेवण्यासाठी तीनहून अधिक बॉलिवूड सिनेमे साईन करण्याची शक्यता आहे. जर का असं असेल तर ही बातमी प्रियंकाच्या फॅन्ससाठी एक खुशखबर ठरणार आहे. दरम्यान आतापर्यंत प्रियंकाच्या टीमकडून अद्याप काही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.  

द स्काय इज पिंक सिनेमा ११ ऑक्टोबर २०१९ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात प्रियंकासोबत फरहान अख्तर आणि झायरा वसीम यांची मुख्य भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रियंकाच्या या सिनेमासाठी तिचे प्रेक्षक बरेच उत्सुक आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी