[VIDEO] : प्रियंका चोपडाच्या वक्तव्याला पाकिस्तानी यूजर्सची साथ

बी टाऊन
Updated Aug 28, 2019 | 22:00 IST | Zoom

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, एका पाकिस्तानी महिलेनं प्रियांका चोपडा युनिसेफ ग्लोबल गुडविल अ‍ॅम्बेसेडर असल्याने प्रियांकाने काश्मीर प्रश्नावर आपलं मत व्यक्त केल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Priyanka Chopra UN
प्रियांका चोपडा युनिसेफ ग्लोबल गुडविल अ‍ॅम्बेसेडर  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडाने या संवेदनशील विषयावर आपले मत व्यक्त केलं होत. अलिकडेच, जागतिक व्यासपीठावर प्रियांकाने उघडपणे मत व्यक्त केल्याबद्दल युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेक लोकांनी प्रियंकाच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. या निर्णयाचे समर्थन करताना एका पाकिस्तानी युजर्सने लिहिले की, मी एक पाकिस्तानी आहे आणि मला असे वाटते की इतर देशांच्या अंतर्गत प्रश्नाबाबत पाकिस्तानने हस्तक्षेप करू नये. त्याऐवजी आपण आपले संपूर्ण लक्ष स्वतःच्या विकासावर केंद्रित केलं पाहिजे.

त्याचवेळी दुसर्‍या युजर्सनं लिहिले की, 'आता आम्हाला देशभक्त होण्याची पाककडून परवानगी घ्यावी लागेल.' एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानी महिलेनं प्रियंका चोप्राच्या गुडविल अ‍ॅम्बेसेडरविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले होते. प्रियांका चोपडाने काश्मीर प्रश्नाबाबत भारत सरकारच्या भूमिकेचं तसेच पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचं जाहीर समर्थन केलं होते. तिची ही भूमिका विरोधात होती त्यामुळे तिला या पदावरुन हटवावे अशी मागणी शिरीन मझारी यांनी आपल्या पत्रातून केली आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आयशा मलिका या पाकिस्तानी महिलेनं लॉस एंजल्स येथील कार्यक्रमात प्रियांका चोपडाला ढोंगी म्हटलं होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी