[VIDEO] 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर पाहून, निर्माता झोया अख्तर झाली प्रभावित

बी टाऊन
Updated Dec 12, 2019 | 19:32 IST

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलर पाहून दीपिकासोबतच, निर्माता झोया अख्तर प्रभावित झाल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे.

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. त्यामुळे या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. तसंच हा ट्रेलर पाहून अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा भावूक झाली होती. त्याचप्रमाणे बॉलिवूड निर्माता झोया अख्तरने या सिनेमाबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, निर्माता झोया अख्तरने छपाक या सिनेमाच्या ट्रेलरला पसंती दिली आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे, झोया अख्तर प्रचंड प्रभावित झालेली दिसत आहे. निर्माता झोया अख्तरने सांगितलं की, हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे, आपण लोकांच्या विचारांत आणि देशातील सिस्टीमला बदलू शकतो. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षतेसाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. तसंच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक मेघना गुलजार या दोघींना छपाक सिनेमासाठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा आहेत. 

 मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसंच या दोघांचेही चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत, असं दिसतयं. छपाक हा सिनेमा पुढील वर्षी १० जानेवारी २०२० ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी