[VIDEO] 'रख तू हौसला' अक्षय कुमारने रिलीज केलं नवं गाणं

बी टाऊन
Updated Jun 09, 2020 | 18:25 IST

Akshay Kumar Song: कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धामध्ये अक्षय कुमार फ्रंटलाइन वॉरियर्सना सतत प्रोत्साहन देत आहे. अक्षय कुमारने 'रख तू हौसला' हे नवं गाणं रिलीज केले आहे.

मुंबई: Akshay Kumar Rakh Tu Hausla Song: कोरोना व्हायरसविरुद्ध  भारताचं जे युध्द सुरु आहे त्या युद्धातील फ्रंटलाइन योद्धांना अभिनेता अक्षय कुमार सतत प्रोत्साहन देत आहे. आता अक्षयचं एक गाणं देखील रिलीज झालं आहे. 'रख तू हौसला' हे गाणं  योद्ध्यांना सलाम करण्याासाठी रिलीज करण्यात आलं आहे. 

अक्षय कुमारने या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलं आहे. अक्षयने हा व्हिडिओ शेअर करताना लिहलं आहे की, 'धैर्य एक गुण आहे. पण कोरोना व्हायरस विरूद्धच्या या लढाईत मुंबई पोलिसांचे हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.' 

रख तू हौसला हे गाणं टी सीरीज बॅनरखाली रिलीज करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी