Rakhi Sawant: बॉयफ्रेंडसोबत राखी सावंतने केला नागिन डान्स, व्हिडिओ व्हायरल

Rakhi Sawant Naagin Dance: बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंतचा डान्स व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Rakhi sawant boyfriend adil naagin dance video goes viral in social media entertainment news marathi
Rakhi Sawant: बॉयफ्रेंडसोबत राखी सावंतने केला नागिन डान्स, व्हिडिओ व्हायरल  

Rakhi Sawant dance video: बॉलिवूडची ड्रामा क्विन अशी ओळख असलेली राखी सावंतचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राखी सावंत नागिन डान्स करताना दिसून येत आहे. व्हिडिओत राखीचा बॉयफ्रेंड सुद्धा तिच्यासोबत दिसून येत आहे. राखी सावंत सध्या बिझनेसमन आदिल खान दुर्रानी याला डेट करत आहे.

राखी सावंत रस्त्याच्या मधोमध आदिल खान याच्यासोबत नागिन डान्स करताना दिसून आली. राखी सावंतच्या नागिन डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे. राखी सावंत मीडियासमोर म्हणते, हा माझा नाग आणि मी त्याची नागिन आहे. यानंतर राखी सावंत नागिन-नागिन गाण्यावर आदिलकडे जाते आणि नाचू लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो युजर्सने पाहिला आहे. अनेक युजर्स राखी सावंतची खिल्ली उडवत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी