Rakhi Sawant’s NAAGIN DANCE Video: अभिनेत्री राखी सावंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती नागिन डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिचा बॉयफ्रेंडही दिसत आहे. राखी सावंत सध्या बिझनेसमन आदिल खान दुर्राणीला डेट करत आहे. राखी सावंत रस्त्यावर नागीन डान्स करु लागली आणि प्रियकर आदिलला तिने गारुडी म्हटलं आहे.
हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खरंतर राखी मीडियासमोर म्हणते, 'हा माझा नाग आहे आणि मी त्याचा नागिन आहे'. यानंतर ती 'नागिन' गाणे गात नाचू लागते.
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो यूजर्सनी तो पाहिला आहे. बहुतांश यूजर्स राखी सावंतची यावरुन बरीच खिल्ली उडवत आहेत.