Rakhi Sawant: 'याच्यासोबत' करायचं आहे लग्न', राखी सावंतची सलमान खानला विनंती

Rakhi Sawant on marriage: राखी सावंतने (Rakhi Sawant) बॉयफ्रेंड आदिलसोबतच्या लग्नाबद्दल सांगितले आहे की, तिला बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात लग्न करायचे आहे. यासाठी तिने सलमान खानला (Salman Khan) विनंतीही केली आहे.

rakhi sawant requests salman khan wants to marry boyfriend adil in bigg boss house
Rakhi Sawant: 'याच्यासोबत' करायचं आहे लग्न', राखी सावंतची सलमान खानला विनंती  |  फोटो सौजन्य: Instagram

Rakhi Sawant on getting married at Bigg Boss: मुंबई: राखी सावंत सध्या आदिल खानसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता राखी सावंतने म्हटले आहे की, ती सलमान खानला बिग बॉस सीझन 16 मध्ये लग्न करण्याची विनंती करणार आहे. राखी सावंतच्या म्हणण्यानुसार, 'मी बिग बॉस आणि सलमान भाई यांना आमचं लग्न बिग बॉसमध्येच पार पाडण्याची विनंती केली आहे.' 

'त्याचवेळी राखी सावंतने आदिलला विचारले की, 'आदिलने जर बिग बॉसने तुला सांगितले की तू बिग बॉसमध्ये लग्न करण्यास तयार आहेस का आणि सलमान भाईनेही सांगितले की तू राखीशी लग्न करण्यास तयार आहेस तर तुझे उत्तर काय आहे?' 

यावर आदिल म्हणतो, 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आम्ही लवकरच लग्न करू पण आत्ता नाही.' त्याचवेळी राखी म्हणते की, 'बिग बॉस माझे मामा आहेत, माझे सर्वस्व आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी