Rakhi Sawant on Rhea Chakraborty drugs case: एनसीबीने सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या आणि त्याच्याशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीलाही आरोपपत्रात आरोपी बनवले आहे. ज्यावर बिग बॉस स्पर्धक राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. मीडियाशी संवाद साधताना राखी म्हणाली, 'रिया चक्रवर्ती खूप साधी आहे, ती क्यूट आहे. हे कधी पकडून ठेवतात, कधी सोडतात. मला कळत नाही ही लपाछपी, पकडापकडी का होत आहे.. मला याबाबत काहीही बोलायचे नाही.
हे पोलिसांचे काम आहे. शेवटी आमच्या सुशांतला न्याय मिळाला पाहिजे मग कट कोणीही का रचलेला असेना. याशिवाय राखीने मीडियाला सांगितले की, ती तिचा बॉयफ्रेंड आदिलसोबत श्रीलंकेत एका फॅशन शोमध्ये सहभागी होणार आहे.