Rakhi Sawant On Srilanka Economic Crisis, PM Narendra Modi And Kohinoor: अभिनेत्री राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती श्रीलंकेच्या आर्थिक संकटावर बोलताना दिसत आहे. ती म्हणाला की, तिला कोलंबोमधून कॅसिनोचं ऑफर मिळत आहेत ज्यामुळे ती खूपच त्रस्त झाली आहे. तिला हे समजत नाहीए की, तिथे जावं की नाही.
काही काळ श्रीलंकेतील परिस्थितीबद्दल बोलल्यानंतर राखी असंही म्हणाली की, तिला तिथे कोणी पकडलं आणि मोदीजींकडे पैशाची मागणी केली तर काय होईल? याही पुढे जाऊन राखी म्हणाली की, ती भारताची कोहिनूर आहे आणि मोदीजी तिच्यासाठी काहीही करू शकतात.