Shamshera Audience Review: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) चित्रपट शमशेरा (Shamshera) शुक्रवारी 22 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर चार वर्षांनंतर शमशेरामधून पुनरागमन करत आहे. रणबीर कपूर याआधी 2018 मध्ये आलेल्या संजू चित्रपटात दिसला होता.
रणबीरच्या पुनरागमनाला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. रणबीर कपूरने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या पुनरागमनामुळे रणबीर कपूरचे चाहते खूप खूश आहेत. त्याचबरोबर काहीजण या चित्रपटाला ट्रोल देखील करत आहेत.
एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले की, 'शमशेरा' हा या वर्षातील सर्वात वाईट चित्रपट आहे. इंटरव्हलमध्येच थिएटर सोडल्यासारखं वाटतंय. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'शमशेरा चित्रपट रणबीर कपूरच्या खांद्यावर आहे. रणबीरने ते खूप छान हाताळले आहे. शमशेरामध्ये रणबीर कपूरसोबत वाणी कपूर आहे. याशिवाय संजय दत्त या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे.