मुंबई : बॉलिवूडची सुंदर जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यातल्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. हे दोघंही बर्याचदा एकत्र दिसतात. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या अफेअरची चर्चा बी टाऊनमध्ये सुरू आहेत. जवळपास वर्षभरापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीरने आलियाचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांची भेट घेतली आणि लग्नासाठी आलियाचा हात मागितला. आलियाला लग्नाची मागणी घालताना रणबीरच्या डोळ्यात अश्रू होते. हे दोघंही पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये लग्न करण्याची शक्यता आहे.
ये जवानी है दिवानी फेम दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र काम करणार आहेत. बॉलिवूडमधील हे सुंदर जोडपं पहिल्यांदा ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा हे दोघंही मुख्य भूमिकेत रुपेरी पडद्यावर एकत्र दिसतील. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर आलियासह, महानायक अमिताभ बच्चन, मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.