सैफ अली खानला आता साकारायची आहे 'ही' भूमिका

नुकताच एका मुलाखती दरम्यान अभिनेता सैफ अली खान म्हणाला की तान्हाजी, तांडव आणि आदि पुरुष यामध्ये नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर आपण सकारात्मक भूमिका करु इच्छितो.

Saif ali khan
सैफ अली खानला आता साकारायची आहे 'ही' भूमिका  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: गेल्या वर्षी सैफ अली खानने जवानी जानेमन आणि तान्हाजी सिनेमात केलेल्या नकारात्मक भूमिकांमुळे तो बराच चर्चेत राहिला होता. या चित्रपटांनंतर सैफ अली खानकडे आता अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट येत आहेत. अलीकडेच सैफ अली खानने अ‍ॅमेझॉन प्राइमवरील वेब सीरिज 'तांडव'मध्ये देखील नकारात्मक भूमिका साकारल्याचं दिसून आलं आहे. 
 
सैफ अली खान सध्या जैसलमेरमध्ये त्याच्या आगामी चित्रपट भूत पोलिसच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो आदिपुरुष या चित्रपटात लंकेशची भूमिका साकारणार आहे. तान्हाजी, तांडव आणि आदिपुरुषात नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर आपल्याला सकारात्मक भूमिका साकारायला आवडेल असे या अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी