Salman Khan: बुलेट प्रूफ गाडीमधून एअरपोर्टवर पोहोचला सलमान खान

Salman Khan in Airport: सलमान खानला जिवे मारण्याच्या धमक्या आल्यापासून त्याने आपली लँड क्रूझर कार बुलेटप्रूफ करुन घेतली आहे. आता सलमान खान याच कारमधून विमानतळावर आला असल्याचं पाहायला मिळालं.

salman khan arrives at airport in bullet proof vehicle upgrades car after receiving death threats
Salman Khan: बुलेट प्रूफ गाडीने एअरपोर्टवर पोहोचला सलमान खान  |  फोटो सौजन्य: Instagram

Salman Khan Car: मुंबई: अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मागील काही दिवसापासून सातत्याने येत होत्या. यानंतर त्याने आपली कार अपग्रेड करून बुलेटप्रूफ बनवली. याशिवाय त्याच्याकडे बंदुकीचा परवानाही आहे. आता सलमान खान त्याच्या बुलेटप्रूफ कारमधून विमानतळावर आल्याचं पाहायला मिळालं. 

सलमान खान त्याच्या पांढऱ्या रंगाच्या लँड क्रूझरमधून उतरताना क्लिक झाला. धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घराव्यतिरिक्त सलमान खान चित्रपटाच्या सेटवरही अधिक खबरदारी घेत आहे. 

मेगास्टार चिरंजीवीच्या 'गॉडफादर' या चित्रपटात सलमान खान एक छोटी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर त्याचा एक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये तो लीगर विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे या कलाकारांसोबत दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी