Salman Khan on No Entry Sequel: 2005 मध्ये आलेला सलमान खानचा चित्रपट नो एंट्री ब्लॉकबस्टर ठरला होता. चाहते चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. आता सलमान खानने नो एंट्रीच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली आहे. (salman khan confirms no entry sequel says it will earn in 300 crore read in marathi)
अधिक वाचा : फॅनसाठी रस्त्यात थांबवली कार, खिडकी खाली करून रणबीर बोलला...
किचा सुदीप आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या विक्रांत रोना या चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान सलमान खान उपस्थित होता. या कार्यक्रमात अनीस बज्मीलाही सलमान खानने आमंत्रित केले होते.
भूल भुलैया २ च्या दिग्दर्शकाकडे बोट दाखवत तो म्हणाला, 'तिथे एक लेखक आणि दिग्दर्शक बसले आहेत. हा माणूस 100-100 कोटींचा हिट चित्रपट देतो, तोही कॉमेडीमध्ये. उद्या नो एंट्रीमध्येही ३०० कोटी रुपये देणार. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाईजान चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर सलमान खान नो एंट्रीच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू करणार आहे.
अधिक वाचा : आमिर खानमुळे समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट?