[VIDEO]: 'सांड की आंख' चित्रपटातील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित

बी टाऊन
Updated Oct 15, 2019 | 18:07 IST

"सांड की आंख" या आगामी चित्रपटाचं आसमां हे गाणं प्रदर्शित झालं आहे. गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी आपल्या मधुर आवाजात, लोकांच्या मनावर ठसा उमटवण्यासारखे हे गाणं गायले आहे.

मुंबई: बॉलीवूड सिनेसृष्टीतील अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या 'सांड की आँख' या आगामी चित्रपटातील आसमां हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं, ८६ वर्षांच्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी आपल्या मधुर आवाजात गायिले आहे. हे गाणं ऐकताच आपलं हृदय भरून येईल अशाप्रकारे त्यांनी हे हृदयस्पर्शी गाण गायले आहे. या गाण्यातून पुन्हा एकदा, बॉलिवूड प्ले बॅक सिंगिंगमधून आशा भोसले आपल्या भेटीस आल्या आहेत. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या गाण्याच्या माध्यमातून अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू या दोघी शूटर दादी यांची "चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर" या वृद्ध महिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या गाण्यात शूटर दादी आपल्या नातवंडांना गोल्ड मेडल जिंकण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. कारण हे मेडल जिंकल्यावर, या गावातील  प्रत्येक मुलीवर त्याचा चांगला प्रभाव पडेल आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल. यासाठी या दोघी जीवाची परिकाष्ठा करतांना या गाण्याच्या माध्यमातून दिसत आहेत.

सांड की आंख या चित्रपटातील आसमां या गाण्याला विशाल मिश्राने म्युझिक दिलेलं आहे. तर या गाण्याचे लिरिक्स राज शेखर यांनी लिहिलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी आणि निर्माता अनुराग कश्यप आहे. सांड की आंख हा चित्रपट या महिन्यातील २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी