[VIDEO]: ... म्हणून अभिनेता संजय दत्त झाला नाराज

बी टाऊन
Updated Nov 29, 2019 | 12:53 IST

संजय दत्तच्या 'मुन्ना भाई ३' या आगामी सिनेमाची चर्चा सध्या चालू आहे. मात्र काही कारणास्तव दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी सिनेमाचं काम थांबवलं आहे. त्यामुळे संजय दत्तने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई: बॉलिवूडचा खलनायक अशी ओळख असलेला अभिनेता संजय दत्तच्या आगामी सिनेमाची चर्चा सध्या चालू आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या सिनेमानंतर त्याचा 'मुन्नाभाई ३' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुन्नाभाई ३ या सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी आहेत. किंग खान शाहरूखसोबत, राजू हिरानी एका सिनेमात काम करत असल्यामुळे त्यांनी मुन्ना भाई ३ या सिनेमाचं काम थांबवलं आहे. यामुळे संजय दत्तने दिग्दर्शक राजकुमार हिरानीवर नाराजी व्यक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमारी हिरानी यांच्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' या दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर धमाल केली होती. तसंच हे दोन्ही सिनेमा कॉमेडी थीमवर आधारित होते. या सिनेमातील अभिनेता संजय दत्त आणि आर्शद वारसी या दोघांच्या अप्रतिम भूमिकेमुळे, हे दोन्ही सिनेमा प्रचंड गाजले. आता राजकुमार हिरानी आपल्या मुन्ना भाई ३ या सिनेमावर काम करत होता. मात्र अभिनेता शाहरूख खानसोबत राजकुमार हिरानी एका सिनेमात काम करत असल्यामुळे, त्यांनी मुन्ना भाई ३ या सिनेमाचं काम थांबवलं आहे. सिनेमाचं काम थांबवल्याने संजय दत्तने नाराजी व्यक्त केली आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित मुन्ना भाई ३ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या सिनेमाच्या शूटिंगला थोडा विलंब होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. अभिनेता संजय दत्त आणि सर्किटची भूमिका साकारणारा अभिनेता आर्शद वारसी या सिनेमात दिसणार आहे. मुन्ना भाई सिनेमाच्या सीरिजमधील हा तिसरा भाग आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी