[VIDEO] हा असेल संजय लीला भन्साळीचा पुढील सिनेमा, या टॉप एक्ट्रेसच नाव आलं समोर 

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Sep 14, 2019 | 22:59 IST

इंशाल्लाह सिनेमाचा प्रोजेक्ट स्थगित झाल्यानंतर फिल्ममेकर संजय लीला भन्साळी आपला पुढचा प्रोजेक्ट हिरा मंडीवर काम करत आहेत. भन्साळीचा हा सिनेमा गंगूबाई ऊर्फ मॅडम ऑफ कमाठीपुराच्या जीवनावर आधारित आहे.

sanjay-leela-bhansali
[VIDEO] हा असेल संजय लीला भन्साळीचा पुढील सिनेमा, हा टॉप एक्ट्रेसच नाव आलं समोर   |  फोटो सौजन्य: Instagram

गेल्या काही दिवसांपासून फिल्ममेकर संजय लीला भन्साळीचा सिनेमा इंशाल्लाह संदर्भात अनेक बातम्या समोर येत आहे. सलमान खाननं सिनेमाला नकार दिल्यानंतर सिनेमाचं गणित बिघडल्याचं दिसतंय. आधी चर्चा होती की, सलमान खान आणि आलिया भट्ट या सिनेमात दिसणार आहेत. मात्र त्यानंतर सलमाननं या सिनेमाला नकार दिला. सलमानच्या नकारानंतर हृतिक रोशनला कास्ट केल्याचं बोललं जातं होतं. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, सलमाननं सिनेमा सोडल्यानंतर भन्साळीनं हा सिनेमा स्थगित केला आहे. 

समोर आलेल्या बातम्यानुसार, भन्साळीनं इंशाल्लाहची शूटिंग थांबवली आणि आपल्या पुढच्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरूवात केली आहे. भन्साळीचा पुढचा प्रोजेक्ट हिरा मंडी हा आहे. भन्साळी सध्या आपला ड्रिम प्रोजेक्टसाठी फिमेल लीड एक्ट्रेसेसच्या शोधात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या सिनेमासाठी प्रियंका चोपडाचं नाव समोर आलं होतं. मात्र अद्यापतरी या नावाची ऑफिशियल अनाऊंसमेंट करण्यात आली नाही आहे. दरम्यान हा सिनेमा गंगूबाई नावाच्या एका महिला डॉनवर आधारित असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी