[VIDEO] लॉकडाऊनमध्ये सपना चौधरीचे डान्स व्हिडिओ होतायेत व्हायरल! 

बी टाऊन
Updated May 24, 2020 | 20:24 IST

Sapna Choudhary Dance Video: लॉकडाऊन दरम्यान डान्सर सपना चौधरी हिचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. पाहा तिचा हा नेमका व्हिडिओ कोणताा आहे ते. 

मुंबई: Sapna Choudhary Dance Video on Famous song Teri Aakhya Ka Yo Kajal: एकीकडे संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जारी असताना दुसरीकडे  दुसरीकडे सुप्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिचे डान्स व्हिडिओ हे आता व्हायरल होऊ लागले आहेत.  लॉकडाउन दरम्यान सपना चौधरीचा एक व्हिडिओ यूट्यूबवर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिचं प्रसिद्ध गाणं 'तेरी आख्‍यां का यो काजल' (Teri Aakhya Ka Yo Kajal)यावर ती बेभानपणे थिरकताना दिसते आहे. 

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, सपना लाल आणि काळ्या सूट सलवारमध्ये जोरदारपणे थिरकते आहे. सपना चौधरी हिचा हा जबरदस्त डान्स पाहून तिचे चाहते देखील तिच्यासोबत नाचत आहे. तिचा हा व्हिडिओ बराच जुना असला तरी आता सध्या तो बराच व्हायरल  होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी