Sara Ali Khan: अभिनयाव्यतिरिक्त सारा अली खान तिच्या सौंदर्यासाठी आणि बबली स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. ती तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. आता अलीकडेच साराने एका फॅशन शोमध्ये भाग घेतला होता. जिथे तिने रॅम्प वॉक केला.
लेहेंगा आणि चोलीमध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. साराच्या या सुंदर लुकने अनेकांना भुरळ घातली होती. पण काही लोक असे होते की, त्यांनी तिला ट्रोल करणे सोडले नाही आणि सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली.
साराचा रॅम्प वॉक पाहून एका यूजरला ती जबरदस्तीने चालत असल्याचे जाणवले. साहजिकच लोकांना तिच्या चालण्याची शैली अस्ताव्यस्त वाटू लागली आहे. काही लोकांना तिचे हावभाव आवडले नाहीत. म्हणून तिला भयंकर ट्रोल करणं त्यांनी सुरु केलं आहे.