[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Aug 17, 2019 | 15:21 IST

बॉलिवूड एक्टर शाहरूख खान लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्याची शक्यता आहे. हल्लीच शाहरूखनं दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची भेट घेतली. शाहरूख आणि अनुभव यांची ही भेट ६ तासांची होती. 

SRK
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • शाहरूख लवकरच बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक
  • हल्लीच एका दिग्दर्शकाच्या भेटीला पोहोचला SRK
  • शेवटचा झिरो सिनेमात दिसला होता शाहरूख

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान लवकरच बॉलिवूडमध्ये आपलं कमबॅक करण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार, शाहरूखनं हल्लीच दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची भेट घेतली. जवळपास ६ तास दोघांमध्ये चर्चा झाल्याचं देखील समजतंय. दोघांच्या भेटीनंतर असं बोललं जातं आहे की, शाहरूख खान लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करू शकतो. 

शाहरूख खान शेवटचा झिरो या सिनेमात दिसला होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवली नाही. या सिनेमात शाहरूख सोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा देखील होत्या. दरम्यान आतापर्यंत या चर्चेवर शाहरूखनं किंवा अनुभव यांच्या टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

दुसरीकडे दिग्दर्शक एस. शंकर यांच्या आगामी सिनेमा अभिनेता हृतिक रोशन ऐवजी शाहरूख खान दिसणार असल्याची चर्चा आहे.‘२.०’साय-फाय या सिनेमानंतर 
दिग्दर्शक एस. शंकर यांचा 'अंडरवॉटर साय-फाय' सिनेमा येणार आहे. हृतिक रोशन इतर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने हा सिनेमा करण्यास नकार दिला असल्याचं  समोर आलं आहे. दिग्दर्शकांनी या सिनेमासाठी शाहरूख खानची निवड केली असल्याचं समजतंय. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी