नवी दिल्ली: Suhana Khan viral video: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Bollywood actor Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियाची सर्वात पॉप्युलर स्टार किड आहे. सुहाना लवकरच सिनेमा आर्चीजच्या माध्यमातून डेब्यू करणार आहे. दरम्यान, अजूनही सुहाना खान फोटोग्राफर्ससमोर कम्फर्टेबल असल्याचं दिसून येत नाही आहे. सुहानाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नवीन व्हायरल झालेल्या व्हिडिओत फोटोग्राफर्स सुहानाला पोज देण्यासाठी सांगत आहेत. याच दरम्यान सुहाना खूपच नर्व्हस दिसत आहे. तिथे उपस्थित असलेल्या एका फोटोग्राफरनं म्हटलं, तुमचा तर नवीन सिनेमा येत आहे. तुम्हाला आता मीडियाशी मैत्री केली पाहिजे. तर दुसऱ्या एका फोटोग्राफरनं सुहाना खाननं म्हटलं की, आमचा चेहरा लक्षात ठेवा, आता कसलं टेन्शन? तुमचा सिनेमा अजून यायचा आहे.
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, सुहाना खान व्यतिरिक्त अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor)देखील आर्चीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.