शाहरूख खानच्या जवान सिनेमात दिसणार साऊथचा 'हा' सुपरस्टार, लवकरच सुरू होणार शुटिंग

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jul 07, 2022 | 12:54 IST

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवान सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून किंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

shah rukh khan film jawan
शाहरूख खान 
थोडं पण कामाचं
  • डायरेक्टर एटलीच्या सिनेमात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवान सिनेमात दिसणार आहे.
  • या सिनेमाची घोषणा झाल्यापासून किंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
  • शाहरुख खानसोबत साऊथची लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

मुंबई: Vijay Sethupathi in Jawan: डायरेक्टर एटलीच्या सिनेमात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवान सिनेमात (Jawan Movie) दिसणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून किंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता या सिनेमात साऊथचा सर्वात लोकप्रिय अभिनेता विजय सेतुपतीची एन्ट्री झाली आहे. 

रिपोर्ट्सनुसार, विजय सेतुपती (Vijay Sethupathi)  सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानसोबत जवान या सिनेमात काम करण्यास विजय सेतुपतीने होकार दिला असल्याची बातमी समोर येतेय.  विजय लवकरच मुंबईत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

विजय सेतुपती यांची साऊथमध्ये चांगली फॅन फॉलोइंग आहे.

अधिक वाचा- Beauty Secrets:चमकदार त्वचेसाठी वापरा करीना कपूरचा चंदन फेस पॅक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सेतुपती हा सर्वात बिझी अभिनेता आहे. अशा स्थितीत तारखांवर काम सुरू आहे. तो लवकरच मुंबईत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे. 'जवान'मध्ये शाहरुख खानसोबत साऊथची लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी