[VIDEO]: शाहरूख म्हणतो 'रेल्वे स्थानकावर बर्‍याच मुलींच्या प्रेमात पडलोय'

बी टाऊन
Updated Aug 27, 2019 | 13:02 IST | Zoom

वांद्रे रेल्वे स्थानकात पोस्ट पाकिटाचे अनावरण सुपरस्टार शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. 'माय स्टॅम्प, माय पॉकेट' योजनातून ही संकल्पना राबवली.

Shahrukh khan Bandra railway station
शाहरूख खान  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: वांद्रे रेल्वे स्थानकाला 'युनेस्को' ने जागतिक हेरिटेजचा दर्जा दिला आहे. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाला १३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान दाखल झाला होता. यावेळी अभिनेता शाहरूख खान याच्या हस्ते पोस्ट पाकीटाचे अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टाला महसूल मिळावा म्हणून ही 'माय स्टॅम्प, माय पॉकेट' योजना जाहीर केली आहे. यादरम्यान, शाहरुखने म्हटले की, मला रेल्वे स्थानक आवडतं आणि मी रेल्वे स्थानकांत बर्‍याच मुलींच्या प्रेमात पडलो आहे. आजच्या इंटरनेटच्या काळात पोस्टाची सर्विस मागे पडली आहे. आपल्या पोस्ट मास्तरने वांद्रे रेल्वे स्थानकाच्या इमारतीचा फोटो तिकीटावर छापून महत्वपूर्ण गोष्ट केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला याबद्दल माहिती होईल. शाहरुख पुढे म्हणाला की, इथे येऊन मला आनंद झाला.

पोस्टाची यंत्रणा गावागावात पोहोचली आहे, तिचा अधिकाधिक लोकांनी वापर करावा असं आवाहन शाहरुखनं केलं आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून शाहरुख कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. शाहरूख शेवटचा झिरो चित्रपटात दिसला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...