दिग्दर्शक एस. शंकरच्या आगामी चित्रपटात ह्रतिक रोशन ऐवजी शाहरूख खान?

बी टाऊन
Updated Aug 07, 2019 | 16:09 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

दिग्दर्शक एस. शंकर यांनी आगामी चित्रपट अंडरवॉटर साय-फाय साठी अभिनेता शाहरूख खानला विचारणा केली असल्याची माहिती समोर येत आहे. या आधी हृतिक रोशन 'अंडरवॉटर साय-फाय' मध्ये काम करणार होता.

Underwater Sci-Fi
शाहरूख खान  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: दिग्दर्शक एस. शंकर यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन ऐवजी शाहरूख खान दिसणार असल्याची चर्चा आहे. ‘२.०’साय-फाय या चित्रपटानंतर 
दिग्दर्शक एस. शंकर यांचा 'अंडरवॉटर साय-फाय' चित्रपट येणार आहे. 'अंडरवॉटर साय-फाय' चित्रपटात हृतिक रोशनने काम करावं अशी दिग्दर्शक एस. शंकर
यांची इच्छा होती. परंतु  हृतिक रोशन इतर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.

दिग्दर्शक एस. शंकर यांनी या चित्रपटासाठी शाहरूख खानची निवड केली असल्याचे समजते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये. या चित्रपटात सहकलाकांसाठी जॅकी चेन, तमिळ स्टार थलपति विजय यांची निवड करण्यात आली आहे. दिग्दर्शक एस. शंकर बरोबर शाहरूख खान पहिल्यांदाच चित्रपटात काम करणार असून हा चित्रपट ३डी मध्ये असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी