'लाल सिंग चड्ढा' सिनेमात शाहरुख खानचा सीन येताच थिएटरमध्ये एकच गोंधळ

Fans go CRAZY for Shah Rukh Khan's cameo in Laal Singh Chaddha: लाल सिंग चड्ढा या चित्रपटात शाहरुख खानने कॅमिओ केला आहे. जेव्हा शाहरुखचा सीन थिएटरमध्ये आला तेव्हा चाहत्यांना खूप आनंद झाला आणि ते सेलिब्रेशन करताना दिसले.

shahrukh khan scene came the fans watching lal singh chaddha showed the madness
'लाल सिंग चड्ढा' सिनेमात शाहरुख खानचा सीन येताच थिएटरमध्ये एकच गोंधळ 

Shah Rukh Khan's cameo in Laal Singh Chaddha: आमिर खान आणि करीना कपूरचा चित्रपट लाल सिंग चड्ढा अखेर 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहरुख खानने कॅमिओ केला आहे. शाहरुख खानचा कॅमिओ पाहून चाहते खूप आनंदित झाले आहेत आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

शाहरुख विशेषत: थिएटरमध्ये पडद्यावर आल्यानंतर चाहते अक्षरश: वेडे झाले. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटात नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या नवीन व्हिडिओमध्ये, चित्रपटातील शाहरुख खानचा कॅमिओ पाहून चाहते खूप उत्साहित झाले. ते थिएटरमध्ये ओरडताना, आनंद साजरा करताना दिसत आहेत. शाहरुख समोर येताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली हे देखील तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी