मुंबई: Sherlyn Chopra On Ranveer Singh Nude Photos: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या (Bollywood actor Ranveer Singh) न्यूड फोटोंमुळे (nude photos) सर्वत्र खळबळ उडाली आहे. अलीकडेच रणवीर सिंगच्या या फोटोंमुळे शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) त्याच्यावर आणि पत्नी दीपिका पदुकोणवर (Deepika Padukone) निशाणा साधला आहे.
अभिनेत्री शर्लिन चोप्रा म्हणाली की, एकदा तिने इंटरनॅशनल मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केले तेव्हा समाजाने तिला कॅरेक्टरलेस म्हटले. पण रणवीर सिंगबाबत समाजात दुटप्पीपणा आहे.
अधिक वाचा- असा बनवा घरच्या घरी व्हॅनिला मिल्क शेक, सोपी रेसिपी
यानंतर ती म्हणाली की, दीपिका पदुकोण एका कार्यक्रमादरम्यान बोल्ड कपडे परिधान करत असताना तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती.
पुढे शर्लिन म्हणते की, 'सुदैवाने माझ्या अंगावर कपडे होते पण रणवीर सिंग फोटोशूटसाठी पूर्णपणे नग्न झाला होता.'