[VIDEO] ३६ वर्ष छोट्या हिरोच्या प्रेमात पडते हेमा मालिनी, पाहा 'या' सिनेमाचा भन्नाट ट्रेलर

बी टाऊन
Updated Dec 28, 2019 | 14:50 IST

Hema Malini: ड्रीम गर्ल हेमा मालिनी ही आता लवकरचो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कारण तिच्या एका नव्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. 

मुंबई: ड्रीम गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली हिंदी सिनेमातील अभिनेत्री हेमा मालिनी ही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. 'शिमला मिर्ची' या सिनेमातून ती आपल्याला दिसणार आहे. शोले सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमात हेमामालिनीला तिच्यापेक्षा ३६ वर्षाने लहान असणाऱ्या राजकुमार राव याच्याशी प्रेम होतं. त्यानंतर सुरु होती एक नवी कहाणी. 

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे. ज्यामध्ये राजकुमार रावला हेमा मालिनीची मुलगी रकुल प्रीत सिंह हिच्याशी प्रेम होतं. तो तिला त्याच्या मनातील गोष्ट सांगण्याचा अनेकदा प्रयत्न करतो. पण सांगू शकत नाही. त्यानंतर तो रकुलच्या घरी लव्ह लेटर फेकतो. हेच लव्ह लेटर हेमामालिनीच्या हाती लागतं आणि तिचा गैरसमज होतो. हा सिनेमा ३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याआधी २०१७ मध्ये एक थी रानी या सिनेमात हेमामालिनी दिसली होती. शिमला मिर्ची हा ट्रेलर लाँच होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अवघ्या काही तासात अडीच लाखांहून जास्त लोकांनी हा सिनेमा पाहिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी