Sidharth Malhotra 'या' अभिनेत्रीला करतोय डेट, करण जोहरच्या शोमध्ये केला मोठा खुलासा

Sidharth Malhotra: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने करण जोहरच्या चॅट शोमध्ये आपल्या रिलेशन संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. 

Sidharth Malhotra dating this actress revealed in Karan Johar show watch video
Sidharth Malhotra 'या' अभिनेत्रीला करतोय डेट, करण जोहरच्या शोमध्ये केला मोठा खुलासा 

Sidharth Malhotra dating bollywood actress Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच या दोघांच्या ब्रेकअपच्या संदर्भात बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, या दोघांमध्येही पुन्हा पॅचअप झालं आहे. आता लवकरच सिद्धार्थ मल्होत्रा आणि विकी कौशल हे करण जोहरच्या चॅट शोमध्ये दिसणार आहेत. या शोमध्ये सिद्धार्थने करण जोहर समोर आपल्या नात्याची कबुली दिली आहे. शोमध्ये सिद्धार्थ हा कियारा अडवाणीला डेट करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना दिसून येईल.

याच दरम्यान करण जोहर हा सांगताना दिसून येईल की, गेल्या सीझनमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफच्या नात्याबद्दल तो कसा योग्य बोलला होता. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी २०२१ मध्ये आलेल्या 'शेर शाह' सिनेमात एकमेकांसोबत काम केलं आणि तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा समोर आल्या. गेल्या महिन्यात कियारा आणि सिद्धार्थ हे दुबईत एकत्र होते. कियाराचा ३०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते तेथे गेले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी