Amazon Forest Fire: अ‍ॅमेझॉनच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीवर बॉलिवूडकरांनी व्यक्त केलं दु:ख

बी टाऊन
Updated Aug 25, 2019 | 14:38 IST | Zoom

Amazon Forest Fire: जंगलामध्ये लागलेल्या आगीवर बॉलिवूडमधील आलिया भट्ट, अर्जुन कपूर, दिया मिर्झा, दिशा पटानी यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियात पोस्ट करून दु:ख व्यक्त केलं आहे.

Amazon Forest Fire
अॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: चित्रपटाचे कलाकार वेळोवेळी सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करतात. खरं तर, दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलातील भीषण आग लागल्यामुळे बॉलिवूड कलाकार दु:खी झाले आहेत आणि सोशल मीडियावर त्याबद्दल पोस्ट शेअर करत आहेत. माहितीनुसार, जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन असलेल्या अ‍ॅमेझॉन जंगलाला आग लागली आहे. अॅमेझॉन जंगल संपूर्ण ग्रहाच्या ऑक्सिजनपैकी २० टक्के निर्माण करते. त्यामुळेच जंगलात लागलेल्या आगीच्या बातमीनंतर चिंता व्यक्त करताना सेलेब्रिटींनी पोस्ट शेअर केले आहेत. सेलिब्रिटींनी घटनेचे गांभीर्य समजून घेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दिशा पटानीनं नुकतच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर लिहिलं आहे की, अॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग लागली आहे. या ग्रहामधील २० टक्के ऑक्सिजन येथून तयार होतो. मागील १६ दिवसांपासून आग लागली आहे. यावर कोणतेही माध्यम कव्हरेज नाही का? असं मत व्यक्त केलं आहे. दिशासह आलिया भट्ट, अर्जुन कपूर, दिया मिर्झा यांनी सोशल मिडीयावर आपल मत व्यक्त केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...