[VIDEO] पाहा सनी लिओनी New Year कसं सेलिब्रेट करणार

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेक तारे-तारकांनी वेगवेगळे प्लॅन आखले आहेत. पाहा यावेळी अभिनेत्री  सनी लिओनी नेमकं काय करणार आहे. 

sunny leone
[VIDEO] पाहा सनी लिओनी New Year कसं सेलिब्रेट करणार  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बेबी डॉल फेम सनी लिओनी जेव्हा जेव्हा ती कॅमेर्‍यासमोर येते तेव्हा ती चर्चेत येते. मुलाखती दरम्यान, जेव्हा तिला विचारण्यात आलं की २०२० तिच्यासाठी कसे आहे आणि यावर्षी तिने काय-काय केले, तेव्हा तिने सांगितले की सर्वांप्रमाणेच हे वर्ष तिच्यासाठी फारच भयावह होतं. तिने सांगितले की, ती, आपल्या घरात मुलं आणि पतीसोबत राहत होती. या वर्षी तिला तिच्या मुलांना समजण्यास आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवता आला. 

न्यू ईअर प्लॅनबाबत सांगत असताना सनी लिओनी म्हणाली की, तिचा एक चांगला प्लॅन होता पण कर्फ्यूमुळे तिला घरातच रहावे लागणार आहे. पुढे ती असंही म्हणाली की, हा निर्णय योग्यच आहे आणि जनतेनेही त्यांच्या घरातच रहावे आणि सरकार व पोलिसांना पाठिंबा द्यावा. यासाठी ते सर्वांना प्रवृत्त करत असल्याचे तिने सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी