सुशांतचे एकता कपूर आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत संबंध कसे होते? अंकिताने केला खुलासा 

Ankita Lokhande: बॉलिवूडमधील दिग्गज निर्माते-दिग्दर्शक असलेले संजय लीला भन्साळी आणि एकता कपूर यांच्यासोबत सुशांतचे संबंध कसे होते याबाबत अंकिता लोखंडेने माहिती दिली आहे. 

Sushant Singh Rajput
सुशांत सिंह राजपूत (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर अनेकांनी बॉलिवूडमधील निर्माते-दिग्दर्शकांवर सोशल मीडियात जोरदार टीका केली होती. या संपूर्ण प्रकरणावर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सुशांतचे निर्माते-दिग्दर्शकांसोबत संबंध कसे होते यावर भाष्य केले आहे. 

अभिनेत्री अंकिता लोखंडेने सांगितले की, संजय लीला भन्साळी यांनी सुशांतला आणि मलाही अनेक सिनेमे ऑफर केले होते. मात्र, आम्ही आमच्या काही वैयक्तिक कारणांमुळे सेनेमा करण्यास नकार दिला होता. सुशांतला सिनेमात काम करायचं होतं आणि त्यावेळी सुशांतने एकता कपूर यांना सांगितलं होतं. त्यानंतर एकता कपूर यांनी त्याला परवानगी दिली. त्यानंतर सुशांतने अभिषेक कपूर यांची काय पो छे सिनेमा केला. एकता कपूर यांना सुशांतला डावलायचं असतं तर त्या सहज करु शकत होत्या. पण एकता कपूर, संजय लीला भन्साळी आणि सुशांत यांचे चांगले संबंध होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी