सिद्धार्थ पिठाणीने पोलिसांना पाठविलेल्या ई-मेलबाबत अंकिता लोखंडे म्हणाली...

Ankita Lokhande's reaction on Sidharth Pithani: सुशांत सिंह राजपूत याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याने पोलिसांना एक ई-मेल केला आहे. याबाबत अंकिता लोखंडेला विचारले असता तिने काय म्हटलं पाहूयात...

Sushant Singh Rajput and Ankita Lokhande
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे (फाईल फोटो) 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर दररोज विविध नवनवीन घटना घडत आहेत. या प्रकरणात रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) विरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेत सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या याचिकेत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सिद्धार्थ पिठाणी (Sidharth Pithani)ने पोलिसांना केलेल्या ई-मेलचाही उल्लेख केला आहे. सिद्धार्थ पिठाणी याने वांद्रे पोलिसांना एक ईमेल पाठवला आहे यामध्ये त्याने म्हटलं आहे की, सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबिय रियाच्या विरुद्ध खोटी जबाब देण्यासाठी दबाव टाकत असल्याचं म्हटलं आहे. मला फोन कॉल आला होता असंही त्याने म्हटलं आहे.

सिद्धार्थ पिठाणी याने मुंबई पोलिसांना पाठवलेल्या या ई-मेलवर अंकिताने म्हटलं की, सिद्धार्थ पिठाणी कोण आहे मला माहिती नाही. या ई-मेल बाबतही मला काहीही माहिती नाही. सुशांतचे कुटुंबिय दु:खात आहेत आणि अशा प्रकारे कोण आणि का दबाव टाकेल असं अंकिताने टाइम्स नाऊसोबत बोलताना म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी