VIDEO: सुशांतच्या कूकची टाइम्स नाऊला EXCLUSIVE मुलाखत, ड्रग्जपासून डिप्रेशनपर्यंत अनेक गोष्टींवर केलं भाष्य

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू आहे. सुशांत सिंह राजपूतचा कूक नीरज याने टाइम्स नाऊला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने अनेक गोष्टींवर भाष्य

Sushant Singh Rajput staff Neeraj who is also a CBI witness makes stunning revelations on TIMES NOW
VIDEO: सुशांतच्या कूकची टाइम्स नाऊला EXCLUSIVE मुलाखत  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह राजपूतचा कूक नीरज याची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
  • मुलाखतीत नीरजने अनेक महत्वाच्या गोष्टींवर गेलं भाष्य
  • ड्रग्जपासून डिप्रेशनपर्यंत अनेक गोष्टींवर नीरजने केलं भाष्य

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास (Sushant Singh Rajpur Death Case Inquiry) सीबीआय करत असून आता तपासाला आणखी वेग आला आहे. सुशांतचा कूक नीरज (Neeraj) याचीही सीबीआयने चौकशी केली. कूक नीरज हा सुशांतच्या मृत्यू नंतर फरार असल्याचाही आरोप होत होता आणि तपासापासून आपल्याला दूर ठेवत असल्याचं बोललं जात होतं. पण नुकतेच सीबीआयने नीरजशी संपर्क साधला आणि त्याचा जबाबही नोंदवला आहे. याच नीरजने टाइम्स नाऊला एक्सक्लुझिव्ह मुलाखत (Times Now Exclusive Interview) दिली आहे.

टाइम्स नाऊने नीरजसोबत चर्चा केली असता त्याने अनेक खुलासे केले आहेत. त्या दिवशी काय झाले होते? मृत्युच्या आधल्या रात्री सुशांत कोणाला भेटला होता का? सुशांत ज्यूस नेहमीच घेत असे आणि घटनेच्या दिवशी सुद्धा ज्यूस घेतला. केशवने ज्यूस दिला आणि मी पाणी दिलं होतं. त्यावेळी मी त्यांना शेवटचा भेटलो होते. जवळपास ९ वाजता ज्यूस घेतल्यावर सुशांत आपल्या खोलीत गेला आणि रूम बंद केला. 

रियाने घर सोडल्यावर सुशांत डिप्रेशनमध्ये? 

या प्रश्नावर उत्तर देताना कूक नीरजने सांगितले की, सुशांत आधीपासूनच थोडा डिप्रेशनमध्ये होता. त्यांची तब्येतही थोडी खराब होती आणि रियाने घर सोडल्यापासून ते आणखी त्रस्त होते.

१३ तारखेला घरी कुणी आलं होतं?

सुशांत सिंह राजपूतचा कूक नीरज याने या प्रश्नावर उत्तर देत म्हटलं, १३ तारखेला घरी कुणीही आलं नव्हतं आणि सुशांत सुद्धा घरातून कुठेही गेले नव्हते.

रियाकडून सुशांत ड्रग्ज मागवत होता?

यावर नीरजने सांगितले की, माझ्या समोर असं कधीही झालं नाहीये पण सर गांजा घेत होते. पण ते कोण आणत असे, कुणाकडून मागवलं जात होतं याबाबत मला अधिक माहिती नाहीये. कधी शौविक घेऊन येत असे तर कधी मिरांडा घेऊन येत असे. माझं काम केवळ घरातील काम करणे इतकचं होतं.

नीरजने पुढे सांगितलं की, दिशाच्या मृत्यू झाल्याचं वृत्त ऐकल्यापासून सुशांत थोडा त्रस्त होता. काही दिवस त्यांनी जेवण-पाणी सुद्धा कमी केलं होतं. ८ तारखेला रियाने सांगितलं की कपडे पॅक करा मी जात आहे. सुशांत सरांनी तिला सूट दिली होती. सरांनी आम्हाला सांगितलं होतं मॅडम जे बोलतील ते तुम्हाला करायचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी