मुंबई: १९९३ मध्ये विक्रम सेठ यांनी लिहिलेल्या अ सूटेबल बॉय या पुस्तकावर मीरा नायर यांनी एक वेब सीरिज तयार केला आहे. २३ तारखेला ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर पुन्हा प्रसिद्ध झाली आहे. जी प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. तब्बू आणि ईशान खट्टर अभिनीत या वेब सीरिजमध्ये नमित दास, तान्या मानिकतला, दानेश राजवी, मिखाईल सेन हे देखील दिसणार आहेत. या खास मुलाखतीत नमित दास म्हणाले की ही वेब सीरिज केवळ संघर्षांवर आधारित नाही तर ही वेब सीरिज एका साध्या कथेवर आधारित असून ती आपल्याशी संबंधित आहे.
तान्या मानिकतला म्हणाली की, ही वेब सीरीज इंग्रजीत नक्कीच आहे पण ती अगदी भारतीय इंग्रजीसारखी आहे. जी माझ्यानुसार प्रत्येकजणांना समजेल आणि याचं हिंदी डबिंग देखील आहे. ब्रिटीश साम्राज्यानंतर लोकांनी स्वत:ला त्या वातावरणात कसं जुळवून घेतलं याची ही कहाणी आहे. नमित दास, तान्या मानिकतला, दानेश रजवी, मिखाईल सेन यांनी या वेब सीरीजबद्दलच्या बर्याच रंजक गोष्टी सांगितल्या. आपण संपूर्ण मुलाखत येथे पाहू शकता.